‘माणसं जरा नोटीस आली की रडतात; मला मंगळसूत्र चोरल्यानं जेलमध्ये टाकलं ते चाललं का?’ पडळकरांचा अजित पवारांवर निशाणा

gopichand-padalkar-criticize-ajit-pawar

मुंबई : धनगर समाजाचे नेते म्हणून ओथख असलेले आणि वंचित बहुजन आघाडीचा खास चेहरा म्हणून मिरवणारे गोपीचंद पडळकर यांनी आज घरवापसी केली आहे. वंचित मधून बाहेर पडून गोपीचंद पडळकर यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. घरवापसी होताच पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

ही बातमी पण वाचा:- गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ त्यांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवावी : मुख्यमंत्री

गोपीचंद पडळकर बारामतीमधून अजित पवारांच्या विरोधात निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढणार आहेत. आजचं त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पडळकरांचा ढाण्या वाघ असा उल्लेख करून हा ढाण्या वाघ बारामतीमध्ये अजित पवारांच्या विरोधात लढणार असे जाहीर केले.

या मंचावरून बोलताना पडळकरांनीही त्यांचे जुने घाव ताजे करत अजित पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडले आणि त्यांना टोलाही हाणला.

गोपीचंद पडळकर म्हणाले, मी भाजपमध्ये पहिल्यापासून कार्यकर्ता म्हणून काम केले आहे, राज्याला कोणी वाली राहतो की नाही अशी स्थिती उभी राहली होती. पण मुख्यमंत्र्यांच्या रुपात आता महाराष्ट्राला वाली मिळाला. मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या मागे उभे राहावे. मी त्यांच्याकडे कोणतेही तिकीट मागितलेले नाही, फक्त धनगर समाजाची जबाबदारी घ्या, असं म्हटलं होतं. भाजपचे सरकार आम्हाला काही तरी देऊ शकतो, विरोधक मात्र राज्यामधलं सर्व वातावरण गढूळ करायचे काम करत आहेत. असे म्हणत पडळकरांनी आपले जुने घाव ताजे केले आणि एका मंगळसुत्र चोरल्याचा आरोप आपल्यावर झाला होता तेव्हा जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. ते कसं चाललं. आता मात्र माणसं जरा नोटीस आली की रडतात असं म्हणून पडळकरांनी अजित पवारांवर निशाणा साधत त्यांना टोला हाणला. त्याचप्रमाणे, प्रकाश आंबेडकरांशी माझा कोणताही वैयक्तिक वाद नाही, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी, असं फडणवीस म्हणाले. पडळकर यांनी बारामतीमधून निवडणूक लढवल्यास यंदा आपण बारामतीही जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, एरवी चेह-यावर सदैव रागीष्ट भाव असणारे, रागड्या भाषेतून बोलणार अजित पवार शनिवारच्या पत्रकारपरिषदेत महाराष्ट्रासमोर रडले होते. शरद पवारांना ईडीची नोटीस आल्यावरून अजित पवारांनी कुटूंबप्रमुखाविषयी आपल्या भावना मांडताना त्यांना अ8ू अनावर झाले होते. हाच धागा पकडून गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.