कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचे समजताच गोपीचंद पडळकर अर्ध्या रात्री सोलापुरात दाखल

Gopichand Padalkar

सोलापूर: सोलापुरमध्ये (Solapur news) एका कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचे समजताच अर्ध्या रात्री गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) तात्काळ सोलापुरात दाखल झाले.

सोलापुरातील युवा नेते शरनु हंडे या कार्यकर्त्याला मारहाण झाली.यासंबंधी एक व्हिडिओ पडळकर समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये बसलेले व्हिडिओत दिसत आहेत.तसेच, कार्यकर्त्यांसाठी मध्यरात्री 100 कोस अंतर पार करणारा लोकनेता गोपीचंद पडळकर साहेब. अन्यायाच्या विरोधात संघर्षाशी गाठ मारलेली_ही वाटसरू माणसं कुणीही गृहीत धरू नयेत अशी पोस्ट पडळकर समर्थकांनी ललिहीली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER