गुगलने सांगितले लीप वर्षाचे महत्त्व

google doodle- leap years

नवी दिल्ली : गुगलने लीप वर्षानिमित्त रंगीबेरंगी असे खास डुडल केले आहे. गुगलने नेहमी आपल्या डुडलच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती देते. दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस येतात. त्याला लीप वर्ष म्हणतात. लीप म्हणजे वर्षाचा योग साधत गुगलकडून हे डुडल तयार करण्यात आले आहे.

लीप वर्ष म्हणजे काय?
पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सर्वांनाच ठावूक आहे. पृथ्वीला सूर्याभोवती फेरी पूर्ण करायला ३६५ दिवस लागतात. मात्र पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी ३६५.२४२ दिवसांचा काळ लागतो. ०.२४२ ही वेळ आपण मोजत नाही.

दर चार वर्षांनी या वेळेचे मिळून २४ तास होतात. म्हणजे एक दिवस. हा एक दिवस वाढल्याने फेब्रुवारीचा महिना २९ दिवसांचा होतो. लीप वर्ष सोडले तर इतर वर्षी फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा होतो. आता पुढचे लीप वर्ष २०२४ आणि २०२८ मध्ये येईल.


Web Title : google tells leap years importance

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)