अभिनेत्री आणि डान्सर जोहरा सहगल यांच्या आठवणीत गूगलचे डूडल

Zohra Sehgal

नवी दिल्ली : ज्यांनी विविध क्षेत्रात आपले योगदान दिले होते. गूगल (Google) नेहमीच अशा लोकांच्या आठवणीत डूडल बनवते. आज २९ सप्टेंबर अभिनेत्री, कोरिओग्राफर, डान्सर जोहरा सहगल (Zohra Sehgal) यांच्या आठवणीत गूगल ने डूडल साजरे केले.

गूगलने जोहरा सहगल यांच्या आठवणीत जे डूडल बनवले आहे, त्यामध्ये जोहरा डान्स करताना एक कलाकृती दिसते. हे डूडल खूपच इनोव्हेटिव्ह आहे. या डूडलवर क्लिक केल्यानंतर जोहरा सहगल यांच्या संबंधित माहिती मिळते.

जोहरा सहगल (२७ एप्रिल, १९१२ १० जुलै, २०१४) यांनी अनेक हिंदी चित्रपट केले. जोहरा यांचे १०२ व्या वर्षी निधन झाले. जवळपास ८० वर्षे जोहरा सहगलने नृत्य आणि अभिनयासाठी योगदान दिले आहे.

त्या एक उत्तम डान्स आणि कोरिओग्राफरदेखील होत्या. जोहरा सहगल यांचे खरे नाव साहिबजादी जोहरा बेगम मुमताज उल्लाह खान असे होते. त्यांचा जन्म एक सुन्नी मुस्लिम कुटुंबात झाला होता. त्यांनी चीनी कम, सावरिया, द मिस्ट्रेस ऑफ स्पाइसेस, कौन है जो सपनों में आया?, वीर-जारा, साया, द मिस्टिक मसूर, तेरा जादू चल गया सारखे मुख्य चित्रपट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER