गुड न्यूज : कोल्हापुरात कोरोना रुग्ण संख्येला उतरती कमान

Kolhapur Coronavirus

कोल्हापूर : गेल्या आठ दिवसात जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचा (corona patients ) आकडा तसेच कोर्टाने मृत होणाऱ्यांयांची संख्याही कमी होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांचा आकडा ४३ हजारांवर पोहोचला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात जूनपर्यंत करोनाचा कहर फारसा नव्हता. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात करोनाने हाहाकार उडवला. या दोन महिन्यात जवळजवळ तीस हजारांवर बाधित आढळले. मृतांचा आकडा हजारांवर पोहोचला. माागील आठ दिवस मात्र जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. पूर्वी रोज एक हजारावर बाधित आढळत होते. हा आकडा ५० टक्क्यांनी घटला आहे.

मागील २४ तासात ५४६ बाधित आढळून आले. त्यापूर्वी हा आकडा ३६१ होता. मृतांचा आकडा रोज ३० पेक्षा अधिक होता, तोही आता गेले चार दिवस कमी होत आहे. नऊ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला.

प्रशासनाने सुरू केलेली दंडात्मक कारवाई, जनजागृती, लोकांनीच घालून घेतलेली स्वयंशिस्त यामुळे हा आकडा कमी होत असल्याचे दिसत आहे.

ही बातमी पण वाचा : कोरोना उच्चांक गाठतोय देशात जवळपास 60 लाख रुग्ण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER