खुशखबर : एसबीआय गृहकर्ज ग्राहकांना दिलासा

SBI home loan

नवी दिल्ली : विजयादशमी आणि दिवाळीत घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा उत्साह वाढविणारी खुशखबर आहे. देशातील सर्वात मोठी कर्जपुरवठादार बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) (एसबीआय) गृहकर्ज दरात 25 बेसिस पॉईंटस् (0.25 टक्का) पर्यंत सवलत जाहीर केली आहे.

एसबीआय गृहकर्ज ग्राहकांना त्यांच्या सिबिल स्कोअरनुसार आणि योनोच्या माध्यमातून अर्ज केल्यास 75 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे घर खरेदी केल्यास 25 ‘बीपीएस’पर्यंत व्याज दरात सवलत मिळणार आहे. सणांनिमित्त नुकत्याच जाहीर केलेल्या इतर ऑफर्सबरोबरच एसबीआयतर्फे देशभरात 30 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंतच्या गृहकर्जासाठी ग्राहकांना आधीच्या 10 ‘बीपीएस”ऐवजी 20 ‘बीपीएस’ची सवलत दिली जाणार आहे. ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअरनुसार ही सवलत मिळणार आहे. आठ मेट्रो शहरांतील गृहकर्ज ग्राहकांना हीच सवलत तीन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्ज रकमेवर दिली जाणार आहे. योनोच्या माध्यमातून अर्ज केल्यास सर्व गृहकर्जासाठी 5 ‘बीपीएस’ची अतिरिक्त सवलत दिली जाईल. एसबीआयतर्फे 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जासाठी 6.90 टक्के, तर 30 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी 7 टक्के व्याज दर दिला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER