खुशखबर : पोस्टात नोकरीची संधी, 1371 पदांची भरती

job opportunities in indian post.jpg

मुंबई :- भारतीय पोस्ट (Indian Post) खात्याच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये 1371 जागा भरण्यात येणार आहेत. पोस्टमनची 1029 पदे, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)ची 327 पदे मेलगार्डची 15 पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.

तिन्ही पदांसाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षे असायला हवे. 3 नोव्हेंबर 2020 रोजीचे वय गृहीत धरले जाणार आहे. पोस्टमन आणि मेलगार्ड पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला तीन श्रेणींमध्ये पगार दिला जाणार आहे. हा पगार 21700 रुपये ते 69100 रुपये असणार आहे. तर मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) साठी पगार लेव्हल १ नुसार देण्यात येणार आहे. हा पगार 18,000 ते 56,900 रुपये असणार आहे.

पोस्टातील या जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून 10 नोव्हेंबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्जाची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर ठेवण्यात आली होती. ती वाढवून 10 नोव्हेंबर करण्यात आली आहे.

पोस्टमन आणि मेल गार्डच्या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची 12 वी पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराची स्थानिक भाषा मराठी असणे बंधनकारक आहे. तसेच त्याला मराठीची चांगली माहिती असणे गरजेचे आहे. मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची 10 वी पास प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. तसेच मराठी भाषा येणे बंधनकारक आहे. या भरतीमध्ये कॉम्प्युटर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. यावरून उमेदवार निवडले जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER