खुशखबर : सहा महिन्यात थेट विदेशी गुंतवणुकीत १५ टक्के वाढ

FDI

नवी दिल्ली : कोरोना काळात एप्रिल ते सप्टेंबर सहामाहीतील थेट विदेशी गुंतवणुकीत (Foreign direct investment) १५ टक्क्यांची वाढ ( 15% increases) नोंदवली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०१९ मधील २६ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत एप्रिल ते सप्टेंबर २०२० मध्ये ३० अब्ज डॉलर्सची एफडीआय झाली असल्याचे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन खात्याने जाहीर केले आहे.

गेल्या जुलै महिन्यात देशात १७.५ अब्ज डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक झाली होती. इतर महिन्यात मात्र तितकी गुंतवणूक झाली नाही. सहा महिन्यांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक ज्या उद्योगांमध्ये झाली, त्यात कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये १७.५५ अब्ज डॉलर्स, सेवा उद्योगात २.२५ अब्ज डॉलर्स, ट्रेडिंगमध्ये ९४९ दशलक्ष डॉलर्स, केमिकल्समध्ये ४३७ दशलक्ष डॉलर्स, ऑटोमोबाईलमध्ये ४१७ दशलक्ष डॉलर्स इतकी गुंतवणूक झाली. ज्या देशांमधून भारतात सर्वाधिक गुंतवणूक झाली, त्यात सिंगापूर आघाडीवर आहे. सिंगापूरमधून ८.३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली. त्याखालोखाल अमेरिकेतून ७.१२ अब्ज डॉलर्स, केमॅन आयलँड २.१ अब्ज डॉलर्स, मॉरिशस २ अब्ज डॉलर्स, नेदरलँड १.५ अब्ज डॉलर्स, ब्रिटन १.३५ अब्ज डॉलर्स, फ्रान्स १.१३ अब्ज डॉलर्स, तर जपान ६५३ दशलक्ष डॉलर्स इतकी गुंतवणूक झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER