नागपूरसाठी गुड न्यूज नागपूर मेट्रोचा होणार विस्तार – फडणवीस सरकारच्या

निर्णयाची होणार अंमलबजावणी

devendra Fadnavis & Nagpur Metro

मुंबई : नागपूरसाठी एक गुड न्यूज आहे. अतिशय दिमाखदार अशा नागपूर मेट्रो (Nagpur Metro) रेल्वे प्रकल्पाची कक्षा आता रुंदावणार असून ती थेट वर्धा, रामटेक, भंडारा आणि नरखेडशी जोडली जाणार आहे. त्यासाठी ३३३ कोटी ६० लाख रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पासाठीचा त्रिपक्षीय करार हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना झाला होता.

आता त्यात पुढेच पाऊल टाकत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने राज्य शासनाच्या हिश्याचे २१ कोटी ३० लाख रुपये मंजूर केले आहेत.या प्रकल्पांतर्गत नागपूर मेट्रोचा विस्तार असा होईल – मार्गिका १ -नागपूर ते वर्धा – ७८.८ किमी – ८ स्थानके, मार्गिका २-नागपूर ते नरखेड- ८५.५३ किमी -११ स्थानके, मार्गिका ३- नागपूर ते रामटेक -४१.६  किमी -०८ स्थानके, मार्गिका ४ नागपूर ते भंडारा – ६२.७ किमी -११ स्थानके. या मार्गावर वातानुकुलित मेट्रो ट्रेन्स धावणार आहेत. महामेट्रो, राज्य शासन आणि भारतीय रेल्वे यांच्यात फडणवीस हे मुख्यमंत्री असताना १६ जुलै २०१८ रोजी करार करण्यात आला होता. महामेट्रोने त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल आधीच तयार केला आहे. आता तो केंद्र सरकारला सादर करण्यासाठी नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. सध्याच्या नागपूर मेट्रोची लांबी ३८.२१ किलोमीटर इतकी आहे. त्यात ३८ स्थानके आहेत.

ही बातमी पण वाचा : ‘भाजपचा भेसळयुक्त, तर शिवसेनेचा भगवा शिवरायांचा’, राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER