जेनेलिया देशमुखच्या चाहत्यांसाठी खूश खबर, पुन्हा कमबॅक करणार; रितेश देशमुख म्हणतात …

Genelia And Riteish Deshmukh

मुंबई : बॉलीवूडमधील मेड फॉर इच अदर, क्यूट जोडी म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा ही जोडी प्रसिद्ध आहे. तुझे मेरी कसम या सिनेमातून पक्की खरी मैत्री निभावणारे हे मित्र पूढे ख-या जीवनात आयुष्याचे जोडीदार बनले. रितेश व जेनिलिया यांच्या लग्नाला नुकतीच ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. हे दोघे नेहमी सोशल मीडियावर एकत्र फोटो व मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतात.

या जोडप्याला दोन गोंडस मुलं आहेत. रितेश देशमुख यांनी आपले सिनेृष्टीतले करिअर कायम ठेवले असले तरी जेनेलिया यांनी मात्र, मुलं झाल्यानंतर पूर्णपणे कुडूंबात व्यस्त झाली. परंतु, आता अनेक वर्षांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा जेनेलिया बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार आहेत.

जेनेलियाच्या कमबॅकबद्दल रितेशला विचारले असता तो म्हणाला की, तिने पुन्हा सिनेइंडस्ट्रीत काम केले पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. मग तिने बॉलिवूड, मराठी किंवा इतर भाषेतील सिनेमात काम करावे. लवकरच ती काम करताना दिसेल. अशी माहिती रितेश देशमुख यांनी दिली.