पर्यावरणप्रेमींसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांनी ‘आरे’च जंगल वाचवलं

CM Uddhav Thackeray - Aarey Forest

मुंबई : पर्यावरणप्रेमींसाठी आनंदाची बातमी पुढे आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरे (Aarey Forest) मधील ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी यासंदर्भात प्रस्ताव सादर केला. या बैठकीवेळी मुख्यमंत्री म्हणाले, राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत. राखीव वन क्षेत्राबाबत कलम ४ लावण्यात येऊन त्यानुसार ४५ दिवसांच्या कालावधीत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात येतील. त्या सूचना व हरकती ऐकून घेऊन त्यानुसार वनामधून वगळायचे क्षेत्र निश्चित करण्यात येईल.

झोपडय़ांचे पुनर्वसन तातडीने सर्व प्रकारची बांधकामे, रस्ते, झोपडय़ा आणि आदिवासी पाडे तसेच इतर शासकीय सुविधा या पहिल्या टप्प्यातून वगळण्यात येतील. येथील झोपडय़ांचे पुनर्वसनही तातडीने सुरू केले जाईल. या संपूर्ण कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव हा वन विभागामार्फत लवकरच सादर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच आरे येथील वनसंपदा संरक्षित होणार आहे.

आरेच्या जमिनीसाठी वन कायद्याचे कलम ४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेली आरेची सुमारे ६०० एकर जमीन वनासाठी राखीव झाली आहे. आता ४५ दिवसांच्या कालावधीत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येतील. त्यानंतर नेमकं किती क्षेत्र वनासाठी राखीव असेल व किती वगळायचं याचा अंतिम निर्णय होईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER