
कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी अंबाबाई, केदारलिंग जोतिबा, दत्त भिक्षालिंग, ओढ्यावरील सिध्दीविनायक, बिनखांबी गणेश मंदिर, त्र्यंबोली या मंदिरातील दर्शन वेळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता आज मंगळवारपासून दर्शनाची वेळ सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराची (Ambabai Temple) दर्शन वेळ कमी करण्यात आली होती. या आधी मंदिरातील दर्शनवेळ सकाळी सात ते दुपारी दोन व दुपारी चार ते रात्री आठ आशी होती. या दर्शन वेळेत वाढ करत, ती आता सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. तसेच देवस्थान समितीच्या अधिपत्याखाली येणाऱ्या बाकिच्या मंदिराच्या वेळेसंदर्भात स्थानिक उपसमिती निर्णय घेईल अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व समितीचे सदस्य यांनी दिली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला