गुड न्युज ; सैफ अली खान व करिना कपूरला पुत्ररत्न

Kareena Kapoor - Saif Ali Khan

मुंबई : अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) व करिना कपूर (Kareena Kapoor) यांच्या घरी पुत्ररत्न जन्मले आहे. करिना कपूरने आज गोंडस मुलाला जन्म दिला. काल रात्री करिनाला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2016 मध्ये करिना व सैफच्या पहिल्या मुलाचा म्हणजेच तैमूरचा जन्म झाला होता. गत ऑगस्टमध्ये दुस-यांदा आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी सैफिनाने शेअर केली होती.

आई व बाळाची प्रकृती उत्तम असल्याचे कळतेय. दरम्यान दुस-या बाळाच्या जन्माने पतौडी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. करिना व सैफवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.दुस-या मुलाच्या जन्माआधी करिना व सैफ नव्या अलिशान घरात शिफ्ट झाले आहेत. याच नव्या घरात करिनाच्या बाळाचे जंगी स्वागत होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER