फौंड्री उद्योगाला अच्छे दिन

Foundry industry

कोल्हापूर : केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र शासनाने जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा केली आहे. याचबरोबर अॅटोमोबाईलमधील अनेक वस्तूंवरील निर्यात शुल्कवाढ केली आहे. याचा फायदा कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला होणार आहे. ही पॉलिसी योग्य पद्धतीने राबविली गेली , तर पुढची चार-पाच वर्षे फौंड्री उद्योगाला अधिक चांगले दिवस येणार आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्पात 20 वर्षांवरील वैयक्तिक वापराची आणि 15 वर्षांवरील व्यावसायिक वापरांच्या वाहनांसाठी स्वेच्छा स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा झाली. ही पॉलिसी स्वतंत्रपणे मंत्रालयाकडून जाहीर केली जाणार आहे. मात्र, यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने जुन्या वाहनांचा वापर कमी होणार आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे नव्या वाहनांची मागणी वाढणार आहे. परिणामी, ॲटोमोबाईल क्षेत्राला गती येणार आहे.

कोल्हापुरातील औद्योगिक वसाहतीत जवळपास 300 हून अधिक फौंड्री आहेत. दर महिन्याला त्यातून सुमारे 70 हजार टन कास्टिंग काढले जाते. या उद्योगात दरवर्षी सुमारे 8 ते 10 हजार कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. फौंड्री व्यवसायावर व्हीएनसी, सीएनसी ऑपरेटर, वाहतूक आदी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे सुमारे दीड लाखावर कामगार अवलंबून आहेत. या सर्वांना याचा लाभ होणार आहे.

वाहन स्क्रॅपिंग पॉलिसी नेमकेपणाने स्पष्ट झाली नसली, तरी पहिल्या टप्प्यात मुदतबाह्य शासकीय वाहने स्क्रॅप होतील. जुन्या बस, शासकीय कार्यालयांतील वाहने, शासनाच्या मोठ्या यंत्रणेसाठी असलेले डंपर, ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहनांचेही स्क्रॅपिंग होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER