‘गुड बाय नागपूर !’ तुकाराम मुंढेंनी शेअर केला व्हिडीओ

Tukaram Mundhe Video

नागपूर : नागपूरच्या (Nagpur) महापालिका (NMC) आयुक्तपदावरून बदली करत तुकाराम मुंढे यांना मुंबई (Mumbai) जीवन प्राधिकरणचा कारभार देण्यात आला होता; पण कोरोनातून (Corona) बरे होऊन नवा पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांची ही बदली रद्द करण्यात आली.

दरम्यान, नागपूरकरांची सेवा करताना अनेक अनुभव आल्याचे सांगत जड अंत:करणाने आपला निरोप घेत असल्याचे तुकाराम मुंढे म्हणाले.

तुकाराम मुंढेंनी ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये, नागपूरबद्दलच्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे – “मी गेल्या ७ महिन्यांत या शहरासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने अनेक कामे करू शकलो.” काही प्रोजेक्ट बाकी राहिले याची खंतही मुढेंनी बोलून दाखवली. त्याचसोबत, “माझ्या हृदयात तुम्हा सर्वांचे स्थान आहे, तुमच्या हृदयातही मला ठेवा.” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच, “शासन, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येत कामे केली पाहिजे. मी नागपूरमधून जड अंत:करणाने जात आहे; पण माझ्या घराची दारे आपणासाठी सदैव खुली असतील.” असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER