गोमातेच्या सुरक्षेसाठी ‘गोसुरक्षा विधेयक’ आणणार : मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा

गुवाहाटी :- राज्य सरकार संविधानाच्या चौकटीतच गायींच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलेल, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी सांगितले. आसाममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता राखली. नुकतेच झालेल्या विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात मुख्यमंत्री सरमा यांनी गोसुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. तसेच राज्यपाल जगदीश मुखी यांनी त्यांच्या भाषणात गोसुरक्षेची गरज व्यक्त केली.

गाय आमची माता आहे. आम्ही पश्चिम बंगालहून गायींची तस्करी होऊ देणार नाही. जिथे गायींची पूजा केली जाते, तिथे गोमांसाचे सेवन व्हायला नको. गोसंरक्षण व्हावे ही आमची भूमिका आहे. फॅन्सी बाजार, शांतीपूर, गांधीवस्ती या गुवाहाटीतील ठिकाणी मदिना हॉटेलची गरज नाही. कारण इथले लोक याबद्दल संवेदनशील आहेत, असे आसामचे मुख्यमंत्री सरमा म्हणाले.

ज्या भागात गोमांसाविषयी संवेदनशीलता नाही, तेथे बदल करण्याची आवश्यकता नाही. ही घटनादेखील गोहत्येच्या विरोधात आहे. त्यामुळे संविधानाच्या चौकटीत राहून राज्यातील गायींचा अवैध व्यापार रोखायला हवा, असे मत सरमा यांनी व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button