सुवर्णसंधी : आयडीबीआय बँकेत १३४ पदांची भरती

IDBI Bank - Recruitment

मुंबई : आयडीबीआय बँकेने (IDBI Bank) Recruitment 2020 चे नोटिफिकेशन जारी केले असून स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (Specialist Cadre officer) पदांसाठी भरती आहे. पदवीधर, इंजिनिअर आणि सीएचे शिक्षण घेतलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तर उमेदवारांनी आयडीबीआय बँकेच्या वेबसाईट idbibank.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन अज्जाची सुरूवात २४ डिसेंबर २०२० पासून होत असून ७ जानेवारी २०२१ अंतिम तारीख आहे.

स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदे :

१) डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड-डी) – ११ पदे

२) असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड-सी) – ५२ पदे

३) मॅनेजर (ग्रेड-बी) – ६२ पदे

४) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड-ए) ०९ पदे असे एकूण १३४ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

शिक्षणाची अट

आयडीबीआय बँकेने जारी केलेल्या Recruitment 2020 च्या नोटिफिकेशननुसार वरील चारही पदांसाठी शिक्षणाची वेगवेगळी अट घालण्यात आलेली आहे.

वेगवेगळी अट घालण्यात आलेली आहे. तर जे सामान्य पदवीधारक आहेत किंवा बीएससी ऑनर्स, बीकॉम, बीई/ बीटेक, एमसीए, मास्टर्स इन कम्युनिकेशन, इकोनॉमिक्स व चार्टर्ड अकाउंटेंटमध्ये पदवीधर आहेत. असे सर्व उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. तर कोणत्या पदासाठी कोणती शिक्षणाची अट लागेल याची माहिती पुढील लिंकवर जाऊन पहा.

https://www.idbibank.in/pdf/careers/DetailedAdvertisementSpecialists2020-21New1.pdf

उमेदवारांना शॉर्टलिस्ट कसे केले जाणार?

उमेदवारांनी केलेल्या अर्जावरून शॉर्टलिस्ट केले जाईल. त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही हे विशेष.

IDBI Bank SCO notification 2020 साठी

https://www.idbibank.in/pdf/careers/DetailedAdvertisementSpecialists2020-21New1.pdf

अर्ज करण्यासाठी

https://www.idbibank.in/idbi-bank-careers-current-openings.asp

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER