पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला उधाण

Gold

पुणे : कोरोनामुळे (Corona) यंदाची लग्नसराई लांबणीवर पडली. २७ नोव्हेंबरनंतर लग्नसराई सुरू होत आहे. पाडव्याच्या मुहूर्ताचा योग साधत अनेकांनी सोने (Gold) खरेदीला प्राधान्य दिले. रविवारी सोन्याचा २४ कॅरेटचा १० ग्रॅमला दर ५२ हजार ७०० रुपये, तर चांदीचा दर ६४ हजार ५०० हजार रुपये प्रतिकिलो होता. गेली आठ दिवस सोन्याचे दर सरासरी  ५१ हजार प्रतितोळा असे स्थिर आहेत.

मागील चार महिन्यांच्या तुलनेत सोने स्वस्त झाल्याने सराफ बाजारात तेजीचे वातावरण आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी रविवारी बाजारात एकच गर्दी झाली होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मजुरीवर सूट  अशा सवलतीच्या अनेक योजनाही जाहीर केल्या आहेत. मागील चार महिन्यांच्या तुलनेत सोन्याचे दर स्थिर असल्याने सुवर्णखरेदीला ग्राहकांनी प्राधान्य दिले. गेल्या सहा महिन्यानंतर प्रथमच २० ते २५ टक्क्यांनी सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली. परंपरागत दागिने खरेदीकडे नागरिकांचा कल होता.

यंदा भाजी, सोयाबीन, भात आदी पिकांचे चांगले उत्पादन झाले आहे. ऊसशेती चांगली आहे. प्रतिटन सरासरी तीन हजार रुपये दर मिळण्याची शक्यता आहे. तसेच अनेक ब्रॅण्ड तसेच सराफ व्यवसायकांनी खरेदीवर सवलत योजना लागू केल्याने खरेदीत वाढ झाली असण्याची शक्यताही सराफांनी  व्यक्त केली. जिल्ह्यात पाडव्यानिमित्ताने सुमारे ५० ते ६० कोटी रुपयांची उलाढाल होईल असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER