सोने गुंतवणूकीतून अडीच वर्षांत ६५ टक्के परतावा

gold

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांत सोने दरात सातत्याने वाढ नोंदवण्यात आली आहे. प्रति दहा ग्राम ५८ हजार रुपयांचा आकडा गाठलेल्या सोने दराने ऑगस्ट महिन्यात सरासरी ५२ हजार रुपयांचे दर नोंदवले आहेत. याआधी २०१८ साली ऑगस्ट महिन्यात गेल्या दोन वर्षांत सोने दरात सातत्याने वाढ नोंदवण्यात आली आहे. याआधी २०१८ साली ऑगस्ट महिन्यात सोने दर ३० हजारांखाली उतरला होता. त्यानंतर जानेवारी २०२० पर्यंत प्रतितोळा सोने दर ४० हजार रुपयांखाली होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर मंदीचे सावट असताना सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरली. सोने गुंतवणूकदारांना गेल्या अडीच वर्षांत तब्बल ६५ टक्के परतावा मिळाला. सोने गुंतवणूकदारांनी ऑगस्ट महिन्यात तब्बल ७९ टक्क्यांपर्यंत परतावा मिळवलेला आहे, त्यामुळे पुढील वर्षही सोने गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर असेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध आणि कोरोनामुळे झालेला लॉकडाऊन या सर्व उलथापालथीमुळे सोन्याची चमक चांगलीच वाढली. अडीच वर्षांत सोन्याच्या दरात सरासरी प्रति ग्राम दोन हजार ३०० रुपयांची वाढ झाली आहे. २०१८ मध्ये एप्रिल महिन्यात सोन्याचे सरासरी दर प्रति ग्राम ३ हजार ९८६ रुपये इतके होते. २०२० सालातील सप्टेंबर महिन्यात १०ग्राम सोन्याने सरासरी ५० हजार ७८४ रुपयांचा आकडा गाठला.

परिणामी, आंतरराष्ट्रीय पातळीवर असंतुलित वातावरण व कोरोनाची दुसरी लाट उसळल्यास सोने दर डिसेंबर महिन्यानंतर ६० हजार रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER