सोने ४ दिवसात अडीच हजारांने झाले स्वस्त !

Gold Rate Fall

नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर (Gold Rate)कमी होत आहेत. या आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सोन्याच्या वायदे बाजारात एमसीएक्सवर ऑक्टोबर डिलिव्हरीचे सोने देखील कमी झाले आहे. आजचा दर आहे ४९, २९३ रुपये टोला. चांदीचा भाव आहे ५६, ७१० रुपये किलो. गेल्या ४ दिवसात सोन्याचा दर अडीच हजार (तोळा) तर चांदी ११,००० रुपये (किलो) स्वस्त झाली आहे.

सोन्याच्या किंमतीमध्ये सलग घसरण होण्याचा आजचा तिसरा दिवस आहे. अमेरिकन डॉलरमध्ये (Dollar) आलेल्या तेजीमुळे परदेशी बाजारात सोन्याचे दर २ टक्क्यांनी कमी होऊन १८६२ डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. याचा परिणाम भारताच्या बाजारावरही झाला आहे.

आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत ०. ३ टक्क्यांनी घसरून १, ८५८. ०८ डॉलर प्रति औंसवर आली आहे. युरोपमध्ये आर्थिक मंदीच्या संकेतामुळे अमेरिकन डॉलर इंडेक्स अन्य चलनांच्या तुलनेत आठ आठवड्यांच्या सर्वोच्च स्तराच्या जवळ पोहोचला होता. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर देखील होतो आहे.

ही बातमी पण वाचा : शेअर बाजार गडगडला; ५५० अंकांची घसरण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER