सोने गाठणार ५० हजारांचा टप्पा !

gold-price-crosses-50-thousand-after-7-years.jpg

वर्षअखेरपर्यंत सोने प्रतितोळा  ५० हजार रुपयांपर्यंत मजल मारण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत. १ हजार ५५० डॉलरवर असलेले प्रतिऔंस सोन्याचे दर २ हजार डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने वर्तवली आहे. सध्या सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर सुमारे ३९ ते ४० हजारांच्या आसपास आहे.


मुंबई : वर्षअखेरपर्यंत सोने प्रतितोळा  ५० हजार रुपयांपर्यंत मजल मारण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत. १ हजार ५५० डॉलरवर असलेले प्रतिऔंस सोन्याचे दर २ हजार डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने वर्तवली आहे. सध्या सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर सुमारे ३९ ते ४० हजारांच्या आसपास आहे.

गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे भाव सतत वाढत आहेत. सध्या प्रतिऔंस १ हजार ५५० डॉलर प्रमाणे १ लाख ८ हजार ५०० रुपये प्रतिग्रॅम म्हणजे सुमारे ३ हजार ८२७ रुपये सोन्याचे दर आहेत. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम आणि १ डॉलर म्हणजे ७० रुपये). हे दर प्रतिऔंस २ हजार झाल्यास सोन्याची किंमत प्रतितोळा  ५० हजारांच्या आसपास पोहचणार आहे.

अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मंदीमुळे लोक सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. सध्या भारतासह जगभरात मंदी आहे. शेअर बाजारांत घसरण होत असून, प्रॉपर्टी बाजारही थंड पडले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत सोन्यातील गुंतवणूक गुंतवणूकदारांना आकर्षक आणि सुरक्षित वाटते.