स्वर्ण धातू – इम्यूनिटी आणि खूप काही !

Gold - Immunity

सोनं खरेदी करणे, आभूषण बनविणे, संचय करणे अगदी पूर्वापार सुरु आहे. स्वर्ण धातू आभूषण, पात्र, औषध निर्माणात हजारो वर्षापासून वापरण्यात येत आहे. सुवर्णाचे गुण वर्णन करतांना सांगितले आहे –

सुवर्णं स्वादु हृद्यं च बृंहणीयं रसायनम्‌ । दोषत्रयापहं शीतं चक्षुष्यं विषसूदनम्‌ ।।

सोने मधुररस युक्त हृदयाला हितकर शरीराचे बृंहण करणारे, रसायन गुणाचे, तिन्ही दोषांच्या व्याधींना हरण करणारे, डोळ्याकरीता हितकर, विषनाशन करणारे आहे. याशिवाय सुवर्ण रुची वाढवते, बुद्धी, स्मृती, धृती वगैरे वाढवून प्रज्ञासंपन्नता देते, वीर्य वाढवते, आवाज सुधारते आणि कांती उजळवते. या सर्व गुणांमुळेच स्वर्ण धातू अतिशय किंमती धातू आहे. स्वर्ण शरीरावर असल्यास त्वचा स्पर्श होत राहिल्याने शरीरात थंडावा ठेवते. स्त्रियांना सतत अग्निजवळ उभे राहून काम करावे लागते त्यामुळे उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून सोन्याचे दागिने घालतात.

स्वर्ण जल म्हणजेच स्वर्ण सिद्ध जल रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते. पाण्यात शुद्ध सोन्याचा दागिना उकळवून अर्धे पाणी शिल्लक ठेवावे. हे स्वर्ण सिद्ध जल शरीराचा थकवा दूर करणारे, आजारानंतर येणारा अशक्तपणा दूर करणारे, शारीरीक मानसिक स्थैर्य देणारे आहे.

स्वर्ण धातूवर अनेक प्रक्रीया करून शोधन मारण प्रक्रिये व्दारे भस्म स्वरूपात तयार केले जाते. या भस्माचा वापर करून स्वर्ण कल्प तयार केले जातात. या स्वर्णकल्पाचा वापर अनेक दुर्धर कष्ट साध्य व्याधींची चिकित्सेमधे केला जातो. सर्वच शारीरीक मानसिक व्याधीवर स्वर्ण भस्माचा उपयोग होतो. हृदरोग, कुष्ठ त्वचा विकार, श्वसनाचे व्याधी, उन्माद, प्रमेह, नपुंसकता अशा अनेक व्याधीत स्वर्ण कल्पांचा वापर केला जातो.

लहान मुलांना शारीरीक मानसिक विकासामधे स्वर्णप्राशन दिले जाते. त्यात स्वर्णभस्माचा वापर होतो. मुलांना रोगप्रतिकार क्षमता वाढण्याकरीता स्वर्णप्राशन सारखे औषध नाही. एका रिसर्चनुसार स्वर्ण, कन्सर पेशींवर उपशयात्मक कार्य करणारे आहे.

ज्याप्रकारे सोन्याचा सामाजिक जीवनात महत्त्वपूर्ण स्थान आहे त्याचप्रमाणे आरोग्याकरीता देखील स्वर्णाचा उपयोग विशेष आहे.

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button