अमलीपदार्थ शोधक श्वान मॅक्सला सुवर्णपदक

- राज्य पोलिस कर्तव्य मेळावा

test

पुणे :- येथे सुरू असलेल्या राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात नाशिक शहर पोलीस दलाच्या श्वान पथकातील मॅक्सने सुवर्ण आणि गुगलने कांस्यपदक पटवले. पदक प्राप्त करण्याचे मॅक्सचे हे तिसरे वर्ष आहे तर गुगलने पहिल्यांदाच स्पर्धेत भाग घेतला होता. राज्यभरातील ५० हून अधिक श्वान स्पर्धेत आले होते. श्वान पथक हे पोलिसांसाठी महत्त्वाचे असल्याने त्यांच्याही गुणांचे स्पर्धेदरम्यान आकलन केले जाते.

इंग्रजीचे पुस्तक वाचता आले नाही; दोन शिक्षिका निलंबित

अमलीपदार्थ शोधक म्हणून कार्यरत असलेल्या जर्मन शेफर्ड जातीच्या मॅक्सने सुवर्णपदक पटकावले. हॅण्डलर पोलीस नाईक एन. पी. बाविस्कर आणि पोलीस शिपाई व्ही. के. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या मॅक्सने यापूर्वी २०१७ आणि २०१८ मध्येही सुवर्णपदक पटकावले होते. गुन्हे शोध पथकातील गुगल या डॉबरमन जातीच्या श्वानाची ही पहिलीच स्पर्धा होती. स्पर्धेत भाग घेणे आणि त्यात कांस्यपदक मिळवणे हे गुगलसह शहर पोलीस दलासाठी उत्साहाची बाब ठरली आहे. पोलीस शिपाई जी. ए. कोंडे आणि ए. एस. चव्हाण या हॅण्डलरच्या मार्गदर्शनाखाली गुगल काम करतो.

गुगलचे प्रशिक्षण चंदीगड येथील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात झाले आहे. या यशाबाबत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी श्वान पथकाचे अभिनंदन केले. श्वान पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळू मोरे, श्वान हस्तक पोलीस नाईक नीलेश बाविस्कर, हवालदार भास्कर गांगुर्डे, नितीन पगार, पोलीस नाईक नाना बागूल, कॉन्स्टेबल गणेश कोंडे, विलास पवार, अरुण चव्हाण, राजू जाधव यांच्यासह सर्वांनी आनंद व्यक्त केला.