सुवर्णपदक विजेता ‘मागवा’ उंदीर झाला सेवानिवृत्त!

Maharashtra Today

डोडोमा : टांझानियात सुमारे ७१ सुरुंग तसेच अनेक ठिकाणी स्फोटक शोधून हजारो लोकांचे जीव वाचवणारा मागवा उंदीर नुकताच सेवानिवृत्त झाला. वय झाल्यामुळे मागवाची वास ओळखण्याची शक्ती कमी झाली होती.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, टांझानिया येथील अपोपो ही संस्था १९९० पासून उंदरांना जमिनीतील सुरुंग शोधून काढण्याचे प्रशिक्षण देते. मागवा (Magwa rat )तिथेच प्रशिक्षीत झाला होता. येथे प्रशिक्षण घेतलेल्या उंदरांना ‘हिरो रॅट'(Hero Rat) म्हणतात.

मागवा या उंदराचे वजन १. २ किलो आहे. इतर उंदरांच्या जातीपेक्षा हा उंदीर हलका असतो. मागवाला गेल्या वर्षीच पीडीएसए या संस्थेने सुवर्णपदक देऊन सन्मानित केले होते. मागवा टेनिस कोर्टच्या आकाराएवढ्या मैदानातला सुरुंग अवघ्या २० मिनिटांत शोधू शकतो!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button