स्फोटकं शोधणाऱ्या उंदराला सुवर्णपदक !

Rat -Gold Medal

डोडोमा : कंबोडियामध्येमधील ‘मागावा’ (Magawa) या उंदराने (Rat) ३९ भूसुरुंग आणि २८ जीवन्त स्फोटकं शोधून हजारो लोकांचे प्राण वाचवल्याबद्दल ब्रिटनमधील चॅरिटी संस्था ‘पीडीएसए’ने ‘शौर्य’ पुरस्कार म्हणून त्यांला सुवर्णपदक (Gold Medal) प्रदान केले आहे. चांगले काम करणाऱ्या प्राण्यांचा पीडीएसए सत्कार करते. असा सत्कार प्राप्त करणारा मागावा हा पहिला उंदीर आहे.

एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, एपीओपीओ संस्थेने मागावा या उंदराला या कामासाठी प्रशिक्षित केले आहे. त्याने फुटबॉलच्या २० मैदानाच्या आकाराच्या जागेतून भुसुरुंग आणि स्फोटके शोधली आहेत. त्याचे वजन फक्त १. २ किलो असल्याने तो भूसुरुंगावरून चालला तरी स्फोट होत नाही. तो टेनिस कोर्टच्या आकाराच्या जागेतून फक्त ३० मिनिटात स्फोटके शोधून काढतो. एवढ्या जागेत स्फोटकांचा शोध घेण्यासाठी स्फोटके शोधक उपकरणाचा वापर केला तर शोध घेण्याला ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. मागावा वासावरून स्फोटकांचा शोध घेतो.

एपीओपीओ ही बेल्जीयममधली संस्था आहे. ती आफ्रिका खंडातील टान्झानियामध्ये काम करते. ही संस्था १९९० पासून मागावासारख्या मोठ्या आकाराच्या उंदरांना स्फोटके शोधण्याचे प्रशिक्षण देते. एका उंदराला प्रशिक्षण देण्यासाठी एका वर्ष लागते. त्यानंतर या उंदरांना ‘हिरो रॅट’ उपाधी दिली जाते आणि हे उंदीर ‘स्निफर डॉग’ प्रमाणे स्फोटके शोधनाचे काम करतात.

कंबोडियामध्ये १९७० ते १९८० या दशकात गृहयुद्ध झाले होते. यात शत्रूला ठार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भुसुरुंग पेरण्यात आले होते. या भुसुरुंगामुळे हजारो नागरिक ठार झालेत. एका संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कंबोडियात भुसुरुंगामुळे १९७९ पासून आतापर्यंत ६४ हजार जणांना जीव गमवावा लागला आहे व हजारो लोकांना अपंगत्व आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER