कोल्हापूरच्या रिया पाटील राष्ट्रीय ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक

Gold medal at Riya Patil National Junior Athletics Championship in Kolhapur

कोल्हापूर : गुवाहाटी (आसाम) येथे सुरू असलेल्या ३६ व्या राष्ट्रीय ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२१ ( National Junior Athletics Championship )मध्ये कोल्हापूरच्या रिया नितीन पाटील हिने ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

जानेवारी २०२० मध्ये गुवाहाटी (आसाम) येथे सुरू असलेल्या “खेलो इंडिया युथ गेम्स” च्या तिसऱ्या पर्वात रिया नितिन पाटील हिने ४*४०० रिलेमध्ये महाराष्ट्राच्या तीन मुलींसह रौप्य पदकावर नांव कोरले होते. याचस्पर्धेत ४०० मीटर मध्ये कांस्यपदक पटकावले होते.

नोव्हेंबर २०१९ मध्ये गुंटूर, आंध्रप्रदेश येथे झालेल्या ३५ व्या राष्ट्रीय ज्युनियर अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रिया नितीन पाटील ( Riya Patil)या शालेय विद्यार्थिनीने दोन सुवर्ण व एक रौप्यपदक पटकावले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER