उत्तरप्रदेशात सापडली सोन्याची खाण

Gold found in Uttar Pradesh

लखनौ : उत्तरप्रदेशच्या सोनभद्र परिसरात सोन्याची खाण सापडली आहे. या खाणीचा परिसर सुमारे १०८ हेक्टर असून तिथे तीन हजार टन सोने असेल असा अंदाज आहे. १९८० च्या सुमाराला या भागात सोन्याचे दगड सापडल्यानंतर इथे सोन्याची खाण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर या सोन्याचा शोध घेणे सुरू झाले.

खनिज शोध अधिकारी विजय कुमार यांच्या नेतृत्वात नऊ जणांच्या चमूने पडरक्ष गावाच्या डोंगराळ भागात सोन्याची खाण असल्याला दुजोरा दिला. या खाणीत सोन्याचे दगड सापडतील असे सांगितले. या भागात जमिनीत नुसते सोने नाही तर इतर खनिज संपत्तीदेखील असण्याची शक्यता आहे. १५ दिवसांपासून येथे हवाई सर्वेक्षणदेखील सुरू आहे. येथे युरेनियम असण्याचीदेखील शक्यता आहे. उत्तरप्रदेशमधील सोनभद्र जिल्हा खनिज संपदेसाठी देशात प्रसिद्ध आहे. खाणीच्या सीमा ठरवल्यानंतर ई-टेंडरिंगची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर खाणीचे खोदकाम सुरू होईल.


Web Title : Gold mine found in Uttar Pradesh

Maharashtra Today : Online Marathi News Portal