सोने झाले स्वस्त

Gold rate cheaper

मुंबई :- गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर गगनाला भिडले होते. या काळात सोन्याचे दर तब्बल प्रतितोळा ५७ हजारापर्यंत पोहचले होते. पण आता नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या दरात ४ हजार रुपयांनी घट झाली आहे.

कोरोना काळात गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील गुंतवणूक कमी केली होती. त्यांनी सोन्यात गुंतवणूक केली होती, यामुळेच सोन्याचे दर वाढले होते. आता जगाला कोरोनावरील लसीचे वेध लागले आहेत. देशात तीन लसी अंतिम टप्प्यात आले आहेत. तर रशिया, अमेरिकेच्या दोन लसी पुढील महिन्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. यामुळे सोन्याच्या दरात मोठी घट व्हायला लागली आहे.

३० ऑक्टोबरला सोन्याचा दर 50699 रुपये प्रतितोळा (१० ग्रॅम) होता. मात्र, ९ नोव्हेंबरला तो वाढून 52167 रुपये झाला होता. यानंतर तो कमी जास्त होत राहिला आणि २७ नोव्हेंबरला 48106 रुपये झाला होता. ६ नोव्हेंबरचा विचार करता सोन्याच्या दरात 4000 रुपयांची घट झाली आहे. पुढे कोरोना लस येण्याची शक्यता असल्याने हा दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER