सोने-चांदीचे दर गडगडले

Gold and silver prices fell.jpg

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत सोने – चांदी (Gold-silver) तसेच इतर धातूंच्या दरात घसरण सुरूच असल्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत एमसीएक्स वायदे बाजारात आज सोने-चांदीचे दर गडगडले. सकाळच्या सत्रात सोन्याचे तोळ्याचे अर्थात प्रति  १० ग्रॅमचे दर ५०७ रुपयांनी घसरून ५० हजार २२ रुपयांवर आले होते. फेब्रुवारी वायद्याचे दर ६४६ रुपयांनी घसरून ५० हजार २०३ रुपयांवर आले होते.

दुसरीकडे चांदीच्या प्रतिकिलो दरात १ हजार ७० रुपयांची घट झाली असून चांदीचे दर ५९ हजार ५६५ रुपयांवर आले आहेत. जगभरातील भांडवली बाजार स्थिर होत असल्याने विविध प्रकारच्या धातूंच्या विक्रीचा जोर वाढला असल्याचे बाजार सूत्रांनी सांगितले. जागतिक वायदे बाजारपेठेत अर्थात कॉमेक्सवर सोन्याचे प्रतिऔंसचे दर २१.८० डॉलर्सने घसरून १८८७ डॉलर्सवर आले आहेत.

तर हजर भाव किरकोळ वाढून १८८३ डॉलर्सवर आला होता. कॉमेक्सवर चांदीचे प्रतिऔंस दर १.६३ टक्क्यांनी घसरून २३.५२ डॉलर्सवर आले होते तर हजर भाव २३.४५ डॉलर्सवर स्थिर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER