गोकुळची रणधुमाळी झाली सुरू

Gokul - Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) (Gokul) निवडणुकीची प्रारूप मतदार यादी उद्या सोमवारी (दि.१५) ११ वाजता दुग्ध निबंधक कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, ३५ दूध संस्थांचे ठराव दुबार ठरले असून या संस्थांची सुनावणी होणार आहे.

यादीवर २४ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप आणि हरकती घेण्यासाठी मुदत आहे. या हरकतींवर ८ मार्चला अंतिम निकाल दिला जाईल. १२ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ३६५९ पात्र ठरावधारक संस्था आहेत. यातील पाच संस्थांनी ठराव जमा केले नाहीत. ३५ ठराव हे वादग्रस्त आहेत.

करवीर आणि शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी दोन, कागल चार, पन्हाळा आठ, आजरा, गडहिंग्लज आणि गगनबावडा प्रत्येकी तीन, राधानगरी चार, भुदरगड पाच आणि चंदगडमधील एक अशा दूध संस्थांचे ठराव दुबार असून याची उपनिबंधक दुग्ध यांच्यापुढे सुनावणी होणार आहे. सुनावणीत योग्य कागदपत्रे आणि पुरावे सादर करणाऱ्या व्यक्तीच्या नावे ठराव कायम ठेवला जाणार आहे.

१२ मार्चला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर साधारण ४५ दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. २५ एप्रिल रोजी मतदान आणि २६ एप्रिलला मतमोजणी, असा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER