गोकुळ निवडणूक : पालकमंत्री सतेज पाटलांना धक्का, आघाडीत मोठी फूट

Satej Patil

कोल्हापूर : महाराष्ट्रात चर्चिल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत (Gokul Dudh Sangh Election) मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग धरला आहे. मात्र कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील(Satej Patil) यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत अवघ्या चार दिवसात मोठी फूट पडली. माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी आघाडीला रामराम ठोकण्याची घोषणा केली आहे. आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सरुडकरांनी निर्णय जाहीर केला. गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत राहणार असल्याचं सरुडकरांनी जाहीर केलं.

दुसरीकडे, आमदार प्रकाश आबिटकर आणि राजेश पाटीलही नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत राहायचे अथवा नाही याचा निर्णय ते दोघेही आज घेणार आहेत. गोकुळ मधील विरोधकांना एकत्र आणण्याचा पालकमंत्री सतेज पाटील यांचा प्रयत्न होता. मात्र तालुका स्तरावरील राजकारण विरोधकांची मोट बांधताना आडवं येऊ लागलं आहे. या फुटीमुळे राजर्षी शाहू आघाडीत अवघ्या काही दिवसांतच अस्वस्थता पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER