गोकुळ दूध संघ निवडणूक : महाडिक गटाने खाते उघडले; सूनबाई शौमिका महाडिक विजयी

Gokul Dudh Sangh Result - Maharashtra Today

मुंबई :- गोकुळ दूध संघ निवडणुकीची मतमोजणी होत असून निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध (Gokul Dudh Sangh Election) संघावर कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आणि महिला प्रवर्गात सत्ताधारी गटाच्या उमेदवार शौमिका महाडिक (Shaumika Mahadik) विजयी झाल्या आहेत.

सर्वसाधारण महिलांमध्ये सतेज पाटील (Satej Patil) गटाच्या अंजना रेडेकर विजयी झाल्या, तर महाडिक गटाकडून शौमिका महाडिक ४३ मतांनी विजयी झाल्या. महाडिक कुटुंबीयांतील उमेदवार विजयी झाल्याने जल्लोष केला जात आहे. शौमिका यांना पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली होती. महादेवराव महाडिक आघाडीने खाते उघडल्यानंतर विरोधी गटाकडून फेरमतमोजणीची मागणी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button