शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस जाणं ही एक रुटीन प्रक्रिया … – प्रविण दरेकर

Sharad Pawar & Praveen darekar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये शरद पवार यांच्याकडून निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस असल्याचे समजते.

याबाबत बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस जाणं ही एक रुटीन प्रक्रिया असावी. त्यात विरोधी पक्षाला उगीच त्रास देण्याचा केंद्र सरकारचा अजिबात हेतू नाही, से दरेकर म्हणाले.

तर, कंगनाच्या चौकशीच्या मुद्द्यावर बोलताना सांगितलं, “कंगना ड्रगिस्ट राहिली असेल तर तिची देखील चौकशी व्हावी. कंगनाच्या चौकशीला आमची काहीच हरकत नाही.” असे दरेकर यांनी स्पष्ट सांगितले.

दरम्यान, ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर भाष्य करताना सांगितलं, “सरकार कारखान्यांना, शेतकऱ्यांना मदत करते. त्याचप्रमाणे ऊसतोड कामगारांनाही मदत केली पाहिजे. सरकारने ऊसतोड कामगारांना मदत केली नाही, तर विरोधीपक्ष नेते म्हणून त्यावर जाब विचारु.” असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER