देवी, मुख्यमंत्र्यांना मंदिर उघडण्याची सुबुद्धी दे; नवनीत राणांची प्रार्थना

Navneet Rana & Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनामुळे (Corona) बंद असलेली राज्यातील मंदिर उघडण्याची सुबुद्धी देवीने मुख्यमंत्र्यांना द्यावी, अशी प्रार्थना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केली.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील रेस्टॉरंट, बार, दारूची दुकाने सुरू केली आहेत. मात्र, धार्मिक स्थळ अजूनही बंदच आहेत. सरकारला मंदिरालयच सुरू करायचे होते. मात्र, ‘म’ वरचा अनुस्वार चुकल्याने राज्यातील मदिरालये सुरू झालीत, असा टोमणा त्यांनी मारला.

नवरात्र उत्सवाच्या काळात महिला दहा दिवस उपवास करतात. देवीचे दर्शन घेतात, मात्र, मंदिर बंद असल्याने महिलांना देव दर्शन करता येणार नाही. देवीने मंदिर सुरु करण्याची सुबुद्धी मुख्यमंत्र्यांना द्यावी आणि लवकरच मंदिर सुरू व्हावी, अशी अपेक्षा राणा यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER