‘देवा बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह येऊ देs !’ चिमुकल्याची रडत देवाला प्रार्थना; बच्चू कडू म्हणतात…

Bacchu Kadu

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे राज्य शिक्षणमंत्री आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिल्यानंतर त्यांचे समर्थक ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. आपल्या आवडत्या नेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर सर्वांनाच त्यांची काळजी वाटू लागली आहे.

त्यातच एका चिमुकल्याने बच्चू कडू भाऊ लवकर बरे व्हावे यासाठी रडत रडत देवाकडे प्रार्थना केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. खुद्द बच्चू कडू यांनीच हा व्हिडीओ शेअर केला आहे.

‘देवाss बच्चू कडू भाऊले बरोबर निगेटिव्ह आणू दे, काहीच नोको होऊ देऊ’ असे हा चिमुकला रडत रडत देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहे.

बच्चू कडू यांनीही त्या मुलाला ट्विटरवर सांगितले की, ‘बेटा मला काहीच नाही होणार, औषधीसोबत आपल्या शुभेच्छा व प्रेम आहे. मग मला काही होणार नाही. तू रडलास, तर मला बरं वाटणार नाही. लोकांनी हसावे म्हणूनच आम्ही आयुष्य खर्ची घालतो. खूप मोठा हो, सेवा कर.’ असा बच्चू कडूंनी त्या लेकराला धीर दिला.

बच्चू कडू विदर्भातील सर्वप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. महाराष्ट्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. लहान मुलांपासून तर वृद्धापर्यंत, अगदी गरीब सामान्यांसोबत बच्चू कडू यांची नाळ जुळलेली आहे. विदर्भासह महाराष्ट्रात ‘आपला भिडू बच्चू कडू’ असा नारा लोक आपुलकीने देतात ते यामुळेच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER