शहाणपण देगा देवा !

God give wisdom

प्रत्येकच लहान मूल मोठं होत असताना त्याचे आई-वडील ही विनंती देवाला करत असतील. खूप धडपडणारे, मस्ती करणारे ते लहान बाळ सगळ्यांना थकवते. त्याच्या खोड्या पाहून असं वाटतं की “बापरे, आता याला शहाणपण कधी येणार ! “पण मुळात त्याची हालचाल किंवा नको जीव करून सोडणे म्हणजे त्याचे अव्याहत चाललेले शिक्षणच असते. आणि खोडकरपणा किंवा चुकीच्या सवयी यादेखील काही गोष्टींचा , उपयोग करून दुर होऊ शकतात. कारण मानसशास्त्रातील वर्तनवादी असे सांगतात की मानवाचं कुठलंही वर्तन हे संपादित म्हणजे शिकून मिळवलेलं असतं. त्यात थोडेफार अनुवंशिक भाग असतीलही पण वर्तनाला सुधारून ते योग्य करता येते.

फ्रेंड्स ! सतत शिकत राहणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे. थांबला तो संपला असं म्हटलं आहे ते अगदी बरोबर आहे . मग व्यक्ती शिकतो कसा ? त्याचे चांगले/ वाईट वर्तन कसे घडते ? त्याच्या सवयी कुठून येतात ? कशा पक्क्या होतात आणि त्या दुरुस्त करता येतात का ? यासारखे प्रश्न आपल्याला नेहमी पडतात. पण एक नक्की की शिकल्यामुळे व्यक्ती नकळत पुढे जात राहतो. शिक्षण हे केवळ शाळेत जाऊन किंवा औपचारिक पद्धतीने होतं असं नाही. चालता बोलता आपण अनेक गोष्टी शिकत असतो. अगदी पाळण्यातलं बाळ वर लटकवलेल्या खेळण्याकडे बघून कसं करतं, मुक् संवाद कसा साधत असतो,त्यावेळी त्याचे डोळ्यातले भाव, त्याची हालचाल हे सगळे त्या खेळण्याबाबतचे ‘ गूढ ‘ दूर करण्याच्या प्रयत्नात असतात .

स्त्रिया शेजारी असलेल्या मैत्रिणींकडून, “अग ,बाई भेंडीच्या भाजीत तू ओवा घालतेस का ? “हे नवीन ज्ञान पदरात पाडून , आपली भाजी जास्त चविष्ट करतात. स्थिरावताना अनेक प्रौढ व्यक्ती, कुठे गुंतवणूक फायदेशीर होईल याचे इतरांबरोबर डिस्कशन करत असतात. अहो एवढच काय ! ७५ वर्षाच्या आजी सुद्धा नातवा कडून व्हाट्सअपवर फोटो शेअर करायला, टाईप करायला उत्साहाने शिकतात. तर अशी ही शिकण्याची प्रक्रिया चालत असते.

* या सगळ्यामागे नक्कीच काहीतरी प्रेरणा असावी लागते .अन्न पाण्याची सोय करण्याची प्रेरणा आपल्याला दररोज उठून कामाला लावते.
* मुलाला भूक लागेल हे उद्दीपक आईला स्वयंपाक करायला भाग पाडते.
* म्हणजेच प्रेरणा त्यामुळे हे असणारे उद्दीपक आणि त्या उद्दिपक कामामुळे घडून येणारी कृती ही प्रक्रिया आहे.

शिक्षणाबाबत आपण हे लावून बघूया
लहान मुलाचं, बाळाचं वय, अंगभूत जसे नऊ ते दहा अकरा महिने, या महिन्यांमध्ये सर्वसाधारणपणे मुल पावले टाकायला सुरुवात करते. ही त्याची वयानुरुप प्रेरणा आहे. पण एकूणच सगळ्याच पालकांना आपल्या मुलांनी सगळं कस पटापट शिकावं असं वाटतं. आणि एवढंच नाही तर त्या बाललीलांमध्ये त्यांना निश्चितपणे आनंदही होत असतो.

मग आई किंवा बाबा मुलाला हात सोडून उभे करतात. थोड मागे सरकून “ये …ये..! “असे म्हणतात .प्रेरणा ! हातात मुलाचे आवडते खेळणे धरलेले असते. ते आहे * उद्दिपक म्हणजे स्टिम्युलस. त्या खेळण्यासाठी ते बाळ चालण्यासाठी उद्दीपित होते आणि दोन चार पावले ते टाकते. म्हणजे* ती कृती करण्यासाठी उद्दीपित झालं. (ज्याला आपण ड्रायव्हिंग फोर्स म्हणू शकतो) ही चालण्याची कृती त्या खेळण्यामुळे झाली. स्टिम्युलस खेळण्याला दिलेली प्रतिक्रिया म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे याची ही दोन चार पावले आहेत. मग ते बुदकन पडतं , परत आई-वडील थोडे मागे सरकतात आणि खेळणी दाखवतात …असं करत करत ते बाळ चालू लागतं. या प्रक्रियेत ते थकेल असं वाटायचे आतच आईबाबा त्याला आवडणारा खाऊ देतात .आणि त्या खाऊ मुळे त्याची ती चालण्याची कृती दृढ होते. बघा ते एक प्रकारचे रिवॉर्ड असते. या reward मुळे एखाद्या चांगल्या कृतीला मजबुती मिळते किंवा तसे दृढीकरण होते. अशी जी क्रिया तिला रीइनफोर्समेंट असं म्हणतात. या प्रक्रियेद्वारे बक्षीस आणि शिक्षा (रीवर्ड अँड पनिशमेंट ) यांचा वापर करून एखाद्या चांगल्या कृतीचे दृढीकरण आणि नकोशी कृति काढून टाकणे हे केल्या जाते. याच्या मदतीने योग्य सवयी लावणे. चुकीचे वर्तन नामशेष करणे, त्या वर्तना पासून दूर नेणे. असे वर्तनाचे ” कंडिशनिंग” दृढीकरण करता येते.

थोडक्यात एखादी गोष्ट शिकण्याची प्रक्रिया साधारण अशी होते. त्यासाठी प्रेरणा ( motivation ) उद्दीपक ( stimulation ) आणि प्रतिक्रिया (responce )किंवा प्रतिसाद आणि दृढीकरण ( conditioning ) या चार क्रिया घडत असतात.

या आधारावरच मानसशास्त्र ,व्यक्तीचे चुकीचे वर्तन असामान्य किंवा समायोजित वर्तन बदलून त्याला योग्य दिशा देता येते असे मत मांडते. वर्तनवादी विचारसरणीचे शास्त्रज्ञ असे मानतात.

मानसशास्त्रात समुपदेशन व सायकोथेरपी हे दोन भाग असतात. यापैकी सायकोथेरपीच्या अनेक पद्धती ,विविध विचारांवर आधारित आहेत. त्यापैकी वर्तन वादावर आधारित थेरपी म्हणजे बिहेविअरल थेरपी .

ती असं सांगते की मानवाचं कुठलंही वर्तन हे संपादित म्हणजेच शिकवून मिळवलेलं असतं. म्हणजेच त्यासाठी उद्दीपक व प्रतिक्रिया ही जोडगोळी लागतेच. आपोआपच कुठलेही संपादित वर्तन दूरही करता येतं ! म्हणजे कुठेतरी जर चुकीच्या सवयी लागल्या असतील, चुकीच्या संगतीमुळे वाईट वर्तन घडत असेल तर काही तंत्रांचा वापर करून त्यात बदल करता येतो. जेव्हा एखाद्या उद्दीपकाला अयोग्य, असमायोजित प्रतिक्रिया जात असेल तर आजार उद्भवतात. उदाहरणार्थ एखाद्या मुलाने खेळताना दुसऱ्याला आऊट केले. पण हे आऊट होणे सहजतेने न घेता तो मुलगा खूप चिडला. असं वारंवार होत असेल तर हे हे तसं अयोग्यच समायोजित वर्तन आहे. याउलट जर तर्कसंगत योग्य प्रतिक्रिया असतील तर या सर्वसामान्य योग्य समजल्या जातात .म्हणजेच शिक्षण घेताना किंवा एखादा ज्ञान आत्मसात करताना किंवा समाजात वावरताना जी असमायोजित प्रतिक्रिया जाते ,त्यावर बिहेविअरल थेरपी आपल्या विविध tools चा वापर करून योग्य प्रतिसादात रूपांतर करू शकते.

त्यासाठी साधारण टोकन एकोनोमी, पद्धतशीर असंवेंदीकरण , आदर्श प्रारूपी करण, म्हणजेच मॉडेलिंग,सायको ड्रामा, B- Mod .Asserative ट्रेनिंग, यासारखी विविध प्रारूपे वापरून त्याचप्रमाणे सामाजिक कौशल्य शिकवून वर्तनात बदल घडवून आपण आणू शकतो . आणि या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात येते की, जे मुल हट्टीपणा करत असेल, काही चुकीच्या सवयी लागल्या असतील ,त्यांना शिस्त लावता येते ,दिशा देता येते हे सगळं या थेरपीमुळे शक्य होतं .साधारणत: शिकण्याची प्रक्रिया कशी होते आणि ही थेरपी कशासाठी कामात येते याचा थोडा सहसंबंध येथे लक्षात येतो.

वागणं बदलण्यासाठी, सर्व साधारणपणे टोकन म्हणून काहीतरी बक्षीस किंवा एखादी गोष्ट काढून टाकण्यासाठी पनिशमेंट, किंवा ( सकारात्मक आणि नकारात्मक रेइन्फॉर्समेंट) याचा वापर करावा लागतो .त्याचप्रमाणे बरेचदा चुकीचे वर्तन किंवा कृती ही आपल्या विचारांमधून सुद्धा घडत असते. त्यामुळे विचारांवर काम करणं गरजेचं असतं. बरेचदा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन, ती गोष्ट समजून घेण्याची आपली आकलनाची पद्धत, चुकीची किंवा टोकाची असू शकते. आणि त्यामुळे सुद्धा चुकीचे वर्तन घडू शकते. सर्वसाधारणपणे आठ ते दहा पद्धतीने चुकीचा विचार माणूस करीत असतो. नेमकी चुकीचे विचार कुठे आहेत हे ओळखण्यासाठी थेरपीस्ट मदत करतात आणि एकदा ते समजले, कुठे चुकत आहे हे स्वीकारलं त्याची जागा नवीन विचारांना देण्यासाठी सुद्धा थेरपिस्ट मदत करतात. याला “कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी” CBT असे म्हणतात. चिंता भीती, नैराश्य, सतत येणारे नकोसे नकारात्मक विचार, आणि न थांबवता येणार्या कृती यांच्यासाठी ही थेरपी खूप उपयोगात येते. व्यसन, तसेच स्ट्रेस कमी करण्यासाठी सुद्धा ही पद्धती उपयोगात येते.

यात एक्सपोजर थेरेपी , जर्नल्स लिहून किंवा आपले “थॉट्सचे रेकॉर्ड मेंटेन” करून आपल्या चुकीच्या विचार पद्धतीवर काम करत राहणे शक्य होते. त्याच बरोबर या रायटिंग एक्झरसाइज मुळे clients से नवे वर्तन नवे विचार यांचा योग्य ट्रॅक ठेवता येतो.

“ऍक्टिव्हिटी शेड्युलइग” केल्याने, चांगल्या सवयी लावू शकतो आणि जे चांगलं शिकलो ते व्यवहारात दैनंदिन आणण्याची संधी या निमित्ताने मिळते. स्ट्रेस कमी करण्यासाठी JPRT, हे प्रोग्रेसिव रिलॅक्सेशन तंत्र, उपयोगात येते. स्ट्रेस कमी करण्यासाठी “असरटिवे ट्रेनिंग आणि बॉण्ड्रीज आखणे “उपयोगात येते. हेच तंत्र वापरून चिंता, नैराश्य, व्यसन, eating disorders, व सतत येणारे नकारात्मक विचार, तसेच न थांबवता येणाऱ्या कृती यांच्यावरही उत्तम उपाय होतो.

फ्रेंडस ! कुठलीही थेरपी पी हळद आणि हो गोरी, अशी नाही. त्याने इफेक्ट नक्कीच जाणवतो परंतु सातत्याने सेशन्स करणे, दिलेल्या असाइनमेंट्स पूर्ण करणे, आणि अगदी सहज रित्या न घेणे, अशाप्रकारे जर प्रामाणिक पणे सहभाग असेल तर बऱ्याच गोष्टी सहज शक्य होतात. असेसमेंट किंवा होम वर्क हे अत्यंत गरजेचं असतं. पण यात हयगय client करताना दिसतात .कारण therapies कश्या काम करतात हे माहीत नसतं. त्यामुळे इंटरेस्टिंग असेसमेंट देणे हेही थेरपिस्ट चे एक कौशल्याचे काम होऊन बसतं.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button