गुजरातमधील शेळीच्या दुधाला मिळाली जागतिक बाजारपेठ

Goat Milk.jpg

बडोदा :- बडोद्याजवळील जामजोधपूर तालुक्‍यातील सुमारे २४ खेड्यांमध्ये शेळीपालन हा मोठा व्यवसाय आहे. मात्र या लोकांना शेळींच्या दुधाला १५ रुपये लिटर दर मिळत होता. पण आता या भागातील शेळींच्या दुधापासून निर्मित उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळाल्याने दुधाला ३५ रुपये दर मिळू लागला आहे.

या दुधापासून कंपन्या फ्रोजन मिल्क, मिल्क पावडर आणि साबण बनवत आहेत. या सगळ्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे. यामुळे शेळीच्या दुधाला मागणी वाढली आहे. या भागातील एक मेंढपाळ भोज सानिया याच्याकडे १०० बोकड आणि २०० शेळ्यांचा कळप आहे.

यावरून या भागातील शेळीपालनाचे स्वरूप लक्षात येते. बडोद्याजवळील जामजोधपूर तालुक्‍यातील सुमारे २४ खेड्यांमध्ये मालधारी आदिवासींच्या वस्त्या आहेत. सगळ्यांकडे तालुक्‍यात ३६ हजारावर शेळ्या-बोकड आहेत. आता दूध कंपन्या नियमितपणे शेळ्यांचे दूध संकलन करू लागल्याने मालधारी आदिवासींना अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले आहे, असे भोज सानिया यांनी सांगितले. ते जामजोधपूर तालुक्‍यातील शेठवाडेला गावचे रहिवासी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER