गोव्यातही कोरोना शिरला; तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Goa reports first 3 positive coronavirus cases- Health Department

पणजी : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच आता शेजारील राज्य गोव्यात कोरोनाग्रस्त असल्याची पहिलीच घटना उघडकीस आली आहे. गोव्यात तीन कोरोनाग्रस्त आढळले असून तिंघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. हे तिघेही परदेशातून गोव्यात आल्याचे कळते. बुधवारी गोव्यातील आरोग्य विभागाकडून या तिघांची कोरोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

गोव्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे. गोव्यातील आरोग्य विभागाने रात्री उशिरा प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले की, गोव्यातील तीन कोरोना संशयितांची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला आहे. तिन्ही रुग्ण २५, २९ आणि ५५ वर्षे वयोगटातील पुरुष आहेत.

हे तिघेही जण अनुक्रमे स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतून गोव्यात आलेले आहेत. असे आरोग्य अधिका-यांनी सांगितले. या तिन्ही रुग्णांवर गोवा मेडिकल कॉलेज व रुग्णालयात उपचार केले जात आहेत. तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे अधिका-यांनी सांगितले. तसेच, या रुग्णांना राज्य उत्तम आरोग्यसेवा पुरवीत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाचा चौथा बळी; वाशी येथे कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू