पुण्यात पुन्हा एकदा गवा : नागरिकांत खळबळ

Gava

पुणे : आज (मंगळवार) पुन्हा एकदा बावधनमध्ये गवा आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुणे – बंगळूर हायवे लगत असलेल्या हेमरल या केंद्र शासनाच्या प्रकल्पाच्या कुंपणाच्या आवारातच हा गवा दिसला. त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाचे अधिकारी, पोलिस प्रशासन आणि त्याचबरोबर रेस्क्यू टीम आली असून, त्याला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

तेरा दिवसांपूर्वीच कोथरूडमध्ये गवा आला होता, परंतु त्याला आपला प्राण गमवावा लागला. या ठिकाणी या गव्याच्या जीविताला कुठलाही धोका होऊ नये म्हणून लोकांनी गर्दी करू नये या ठिकाणी येण्याचे टाळावे असे आवाहन नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी केले आहे. कोथरूड येथे सापडलेल्या गव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याची पुनरावृत्ती पुन्हा इकडे होऊ नये यासाठी नागरिकांनी या परिसरात जाण्याचे टाळावे. तसेच हा गवा हायवेच्या अगदी जवळच असल्याने बघ्यांची या ठिकाणी गर्दी झाली आहे. यामुळे बावधन येथील हायवेवर ट्रॅफिक जॅम झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER