कचरा केल्याने गोवा सरकारची करण जोहरला नोटीस

Goa government issues notice to Karan Johar.jpg

चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचा असा समज असतो की, त्यांनी काहीही केले तरी त्यांना कोणी विचारणार नाही. त्यामुळे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी शूटिंग करताना स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. रस्त्यावर कचरा तसाच ठेवलेला असतो. आपण पैसे फेकतो त्यामुळे आपले कोणी काही करणार नाही असा समज या निर्मात्यांमध्ये असतो.

करण जोहरलाही (Karan Johar) असेच वाटत असावे. म्हणूनच त्याने गोव्यात आपल्या चित्रपटाचे शूटिंग करताना प्रचंड कचरा करून ठेवला. मात्र त्याचे हे वर्तन गोवा सरकारला आवडले नसून करणने याबाबत माफी मागावी आणि कचरा उचलावा अन्यथा दंड आकारला जाईल असे बजावले आहे.. तर एका संस्थेने करणने माफी मागावी अन्यथा त्याच्या मुंबईतील ऑफिसमध्ये सगळा कचरा टाकण्यात येईल असा इशारा दिला आहे.

करणच्या धर्मा प्रॉडक्शन या बॅनरअंतर्गत गोव्यातील एका गावात शूटिंग सुरु होते. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिका साकारीत आहेत. शूटिंगच्या वेळेस यूनिटने आख्ख्या गावात प्लॅस्टिकचा कचरा तर करून ठेवलाच सोबत पीपीई किटही कुठेही रस्त्यावर टाकून दिले आणि पर्यावरणाचा नाश केला. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा ने करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनला कारणे दाखवा नोटीस बजावली असून ‘लोकान्चो एक्वोट गोवा’ संस्थेने तर 48 तासात धर्मा प्रॉडक्शनने माफी मागितली नाही तर सर्व कचरा करणच्या घरी पाठवू असा इशारा दिला आहे. मुंबईत असा कचरा केला असता का असा प्रश्नही संस्थेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

कंगना रानौतनेही यात उडी घेतली असून केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनाच याबाबत ट्विट करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER