भाजपला पुन्हा धक्का : गोव्याच्या सत्तेतील भागीदार पक्ष एनडीएमधून बाहेर

BJP

मुंबई :- भारतीय जनता पक्ष (BJP) प्रणीत एनडीएला गोव्यातून मोठा धक्का बसला आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांच्या नेतृत्वात गोवा फॉरवर्डची राज्य कार्यकारिणी बैठक झाली. यामध्ये एनडीएबाहेर (NDA) पडण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला.

गोव्यात मार्च २०१७ मध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेत परत येण्यामध्ये गोवा फॉरवर्ड पार्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. खरं तर पक्षाची स्थापना करताना झालेल्या पत्रकार परिषदेत गोवा फॉरवर्ड पार्टीचे तत्कालीन अध्यक्ष प्रभाकर टिंबळे यांनी भाजप वगळता कोणत्याही पक्षाशी आघाडी करण्याची भूमिका जाहीर केली होती.

गोवा फॉरवर्ड पार्टी (जीएफपी) हा गोवा राज्यातील स्थानिक राजकीय पक्ष आहे. त्याचे नेतृत्व विजयी सरदेसाई करत आहेत. २५ जानेवारी २०१६ रोजी सरदेसाईंनी गोवा फॉरवर्ड पार्टीची स्थापना केली होती. २०१७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत जीएफपीने चार उमेदवार उभे केले होते. विशेष म्हणजे यापैकी तीन जागांवर पक्षाला विजय मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button