गोवा : पर्रा गावातला ‘फोटोकर’ रद्द !

Parra village

हे लहानसे राज्य नैसर्गिक सौंदर्याने  नटलेले आहे. गोव्यातील असेच एक गाव आहे पर्रा. माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे हे गाव. या गावात पर्यटकांची फोटो काढण्यासाठी गर्दी होते. त्यामुळे गावाने फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडीओ चित्रीकरणासाठी ५०० रुपये कर लावला होता; प्रशासनाने तो कर रद्द केला आहे.


गोवा :-  हे लहानसे राज्य नैसर्गिक  सौंदर्याने   नटलेले आहे. गोव्यातील असेच एक गाव आहे पर्रा. माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे हे गाव. या गावात पर्यटकांची फोटो काढण्यासाठी गर्दी होते.  त्यामुळे गावाने फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडीओ चित्रीकरणासाठी ५०० रुपये कर लावला होता; प्रशासनाने तो कर रद्द केला आहे. या गावातील रस्त्यांवर आणि चर्चमध्ये शाहरुख व आलियाच्या ‘डिअर जिंदगी’ चित्रपटाचे चित्रीकरण झाले.

 तेव्हापासून येथे पर्यटकांची गर्दी आणखी वाढली आहे. मुख्यत्वे चित्रपटाचे चित्रीकरण ज्या रस्त्यावर झाले, तो गावातला रास्ता फोटोसाठी गर्दीचे ठिकाण बनला. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी  लांबपर्यंत नारळाची उंच झाडे असल्याने त्याचे फोटो खूप सुंदर येतात. पर्रा गावात गावकऱ्यांनी  ‘फोटोकर’ लावल्याचे प्रशासनाला कळले तेव्हा, यामुळे पर्यटकांची संख्या कमी होईल हा धोका ओळखून फोटोकर रद्द केला. आता, कर न भरता फोटो काढून ५०० रुपयांची बचत करण्यासाठी पर्राला जाच.

या गावातील रस्त्यांवर आणि चर्चमध्ये शाहरूख व आलियाच्या ‘डिअर जिंदगी’ चित्रपटाचे चित्रीकरण झाले तेव्हापासून येथे पर्यटकांची गर्दी आणखी वाढली आहे. मुख्यत्वे चित्रपटाचे चित्रीकरण ज्या रस्त्यावर झाले, तो गावातला रास्ता फोटोसाठी गर्दीचे ठिकाण बनला. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने लांबपर्यंत नारळाची उंच झाडे असल्याने त्याचे फोटो खूप सुंदर येतात.

ही बातमी पण वाचा : रत्नागिरी समुद्रकिनारी सापडला व्हेल मासा