गोव्याचे उपसभापती म्हणाले, मीसुद्धा भाजप सरकार पाडण्याच्या प्रयत्नात होतो

BJP

पणजी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार आणि सध्या गोवा विधानसभेचे उपसभापती असलेले इजदोर फर्नांडीस यांनी विधानसभेत सांगितले की भाजप सरकार पाडण्यासाठी मी सुद्धा हालचाली करत होतो. काँग्रेसमधून 10 आमदार भाजपात दाखल झाले होते. त्यात फर्नांडीस यांचा समावेश होता. गुरुवारी विधानसभेचे उपसभापती म्हणून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आणि त्यांचे सभागृहाच्या सदस्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले यावेळी त्यांनी बोलताना सांगितले.

सरकारपक्षात असतानाही आमदार झालो तरीही मं6ी झालो नाही. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विरोधात अधिक बसलो. मुख्यमंत्री बनलेले सर्वजण त्यापूर्वी केव्हातरी आपल्या घरी येवून गेलेले होते. परंतू मुख्यमंत्री बनल्यावर त्यांनी मला मंत्री केले नाही. तुमचे नाव शेवटच्या क्षणी यादीतून बाहेर पडल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसच्या सरकारातही आपल्याला मंत्री बनविण्यात आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.