गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना जीवे मारण्याची धमकी

Pramod Sawant

मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना धमकीचे मेसेज येत असल्याची माहिती समोर आली आहे . मुख्यमंत्री सावंत यांना पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये खंडणीची मागणी करून त्यांनी जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.

सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून धमक्या येत आहेत. या प्रकरणी पणजी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली.

१ नोव्हेंबरपासून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या खाजगी मोबाईलवर हा अज्ञात इसम मेसेज पाठवून खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देत होता. हा प्रकार तीन-चार दिवस सुरू होता. अखेर याची गंभीर दखल घेत पोलिसांत धाव घेण्यात आली आहे.

सावंत यांचे ओएसडी आत्माराम बर्वे यांनी गुरुवारी संध्याकाळी उशिरा पणजी पोलीस स्थानकाला मेल पाठवून याबाबत तक्रार केली. यावर अज्ञाताविरोधात एफआयआर नोंदवून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER