गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण

Pramod Sawant

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे. ते गृहविलगीकरणात राहणार आहेत. लक्षणे नसून गृहविलगीकरणात राहणार आहेत. घरातूनच कामकाज हाताळणार आहेत. जे कोणी आपल्या संपर्कात आले आहेत त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विटद्वारे केले आहे.

देशातील अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याचबरोबर गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर मात केल्यानंतरही एम्स रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. त्यांना नुकताच डिस्चार्ज मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER