गोवा भाजपचाच बहुतांश तालुक्यात ताकद वाढली

BJP Flags

गोवा : गोव्यातील 12 तालुक्यांपैकी बहूतांश तालूक्यात भाजपाने ताकद दाखवली आहे. शेवटच्या क्षणी मतदारांना घराबाहेर काढण्यात भाजप नेत्यांना आलेल्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले. भाजपचे (BJP) संघटन कौशल्य आणि भाजप उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह घरोघरी भेट दिल्यामुळे मतदान भाजपच्या बाजूने वळले आहे.

शेळ मेळावली येथे आयआयटीला विरोध करणाऱ्यांना सत्तरी तालुक्यातील मतदारांनी नाकारले असून सत्तरीतील सर्व जागा जिंकून आणण्यात स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे यश कौतुकास्पद आहे.

सुकूरमध्येही अपक्ष आमदार रोहन खंवटे आणि गोवा फॉरवर्डचे जयेश साळगावकर यांनी संयुक्तपणे उभे केलेल्या उमेदवार वैशाली सातार्डेकर यांना धूळ चारून भाजपचे कार्तिक कुडणेकर यांनी विजय मिळवला. सर्वांना लक्ष लागून राहिलेली शिवोलीची जागा भाजपच्या सनिषा तोरसकर यांनी जिंकली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अभिनंदनपर संदेशात गोव्याच्या जिल्हा पंचायतीचा निकाल म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर राज्यातील शेतकरी, कामगार,व्यापारी, महिला आणि युवा वर्गांने दाखवलेल्या विश्वासाचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे. गोव्यातील भाजप सरकारचे धोरणालाही मतदारांनी दाखवलेली पसंतीच असल्याचे नड्डा म्हणतात. भाजपचे गोवा प्रभारी सी.टी.रवी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत , भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, अन्य मंत्री व भाजप आमदारांचे तसेच गोमंतकीय जनतेचे आभार मानले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER