‘थर्टी फर्स्ट’साठी गोवा सज्ज; समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले

Goa beach ready for Thirty First party.jpg

पणजी : नववर्षाच्या स्वागतासाठी आणि थर्टी फर्स्टच्या (Thirty First party) जल्लोषात गोवा सज्ज (Goa beach) झाला आहे. समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून पणजीसह राज्यात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेषतः किनारी भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

ही बातमी पण वाचा:- कोल्हापूर : यदा थर्टी फर्स्ट शाकाहारी!

नववर्ष स्वागतासाठी सेलिब्रिटीही गोव्यात दाखल होऊ लागले असून यात अभिनेत्री मलायका अरोरा, अर्जुन कपूर तसेच सनी लियोनचाही समावेश आहे. गुजरात, झारखंड, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटकमधील पर्यटकांची संख्या मोठी आहे. मिरामा,सांता मोनिका जेटी तसेच पणजी बसस्थानकावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पणजीसह विविध किनारी भागात पर्यटकांची संख्या वाढल्याने वाहनांची कोंडी सर्वत्र दिसून आली. पत्रादेवी बांदा येथे तसेच पणजी शहरात प्रवेश करणाऱ्या तसेच शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांना थांबवून त्यांची तपासणी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER