गोवा : ५१ व्या इफ्फीची सुरुवात

Goa

पणजी : गोव्याची शान असणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे ५१ व्या इफ्फीची सुरुवात आज झाली. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर इफ्फीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. जावडेकर म्हणाले, की आज आपण सगळे कोरोनासारख्या महामारीसोबत लढत आहोत. मात्र मी तुम्हाला विश्वास देतो या लढाईत भारत जिंकेल आणि कोरोनाची हार होईल. येत्या नोव्हेंबरमध्ये इफ्फी २०२१ सर्वोत्कृष्टरित्या साजरा केला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतिजा, अभिनेता सुदीप संजीव, दिग्दर्शक प्रियदर्शन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
एका खुर्चीवर बसून जगाची सफर घडविण्याची क्षमता चित्रपटात आहे. चित्रपटाचे जग अनुभवता आले पाहिजे, असे मत अभिनेता सुदीप संजीव यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याहेतु मर्यादित लोकांना उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले होते.

यावेळी अभिनेता अनिल कपूर, रणवीर सिंग विकी कौशल, सिद्धांत चतुर्वेदी, अनुपम खेर, अभिनेत्री विद्या बालन, माधुरी दीक्षित यांनी इफफीला डिजिटली शुभेच्छा दिल्या. गायिका सोनिया शिरसाट यांनी यावेळी गीत गायले तर गोमंतकीय कलाकारांनी समईनृत्य आणि इतर कलाप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री तिस्का चोप्रा हिने केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER