…चंबू गबाळ आवरुन तुझ्या राज्यात जा; संजय राऊतांनी कंगनाला सुनावले

Sanjay Raut & Kangana ranaut

मुंबई : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित करत, बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांवर आरोप करणाऱ्या कंगनाने (Kangana Ranaut) मुंबई पोलिसांवरही आरोप केला आहे. भाजपायाचे नेते राम कदम (Ram kadam) यांच्या ट्वीटला उत्तर देताना कंगना म्हणाली, मला मुंबई पोलिसांची जास्तच भीती वाटते.

तिने ट्वीट केले होते – ‘मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकार किंवा थेट केंद्राकडून सुरक्षा द्या, पण मुंबई पोलिसांकडून नको.’

कंगनाच्या मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणाऱ्या या ट्वीट संदर्भात बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, ‘मुंबई पोलिसांवर अविश्वास तुम्ही दाखवता. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी चंबू गबाळ आवरावे, आपल्या राज्यात जावे. हा काय तमाशा चालला आहे? पुढे ते म्हणाले की, ‘राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर ताबडतोब उत्तर दिले पाहिजे, मग ते कोणी असेल. या राज्यावर, पोलिसांवर विश्वास नाही. तुम्ही इकडे मीठ खाताय, ही तर बेईमानी आहे. अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर हीसुद्धा मोठी बेईमानी आहे. त्यामुले मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी हा विषय गांभीर्याने घेत अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे.’

कंगनाचे ड्रग कनेक्शन

सोशल मीडियावर चार वर्षापूर्वीची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत असून ही मुलाखत आहे अध्ययन सुमन म्हणजे शेखर सुमन यांच्या मुलाची. कंगना आणि अध्ययन रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. या मुलाखतीत कंगना कशी अमली पदार्थाचे सेवन करत होती ते सांगितलं आहे. कंगना ‘हॅश’ या अमली पदार्थाचे सेवन करत होती असे तो सांगतो. तो म्हणतो की, ‘अमली पदार्थाचे सेवन हे कंगनासाठी नवे नाही. ती हॅश हा ड्रग घेत होती. माझ्यासमोर तिने घेतले आहे. ती कोकेनही घेत असावी. तिने कोकेन माझ्यासमोर घेतले नाही. पण हॅश ती घ्यायची. तिने मलाही खूपदा ऑफर केली आहे पण मी कधी घेतले नाही.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER