“गो दीदी गो” रामदास आठवले लढणार पश्चिम बंगालमध्ये विधानसभा

Ramdas Athawale

मुंबई :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक लढणार, अशी घोषणा पक्षाचे प्रमुख रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शुक्रवारी मुंबईत केली.

आठवले केंद्रातील सत्ताधारी एनडीए सरकारचे मंत्री आहेत. पश्चिम बंगालच्या जनतेला बदल हवा आहे. भाजपा आगामी निवडणुकीत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया १५ ते २० जागांवर निवडणूक लढवणार आहे आणि भाजपाला पाठिंबा देणार आहे, असे ते म्हणालेत.

बुधवारी संध्याकाळी नंदीग्राम येथे मुख्यमंत्री बॅनर्जी जखमी झाल्यात. तृणमूल काँग्रेसने ममतावर हल्ला झाल्याचा आरोप केला. यावर आठवले यांनी शंका व्यक्त केली. म्हणाले की बंगालमध्ये यापूर्वी बॅनर्जी यांच्यावर कधीही हल्ला झाला नव्हता आणि आता तसे होणे कठीण आहे.

“ममता बॅनर्जी यांच्यावर कोणी हल्ला केला किंवा काय योजना होती हे मला माहिती नाही. याची चौकशी झाली पाहिजे. यात काही राजकारण आहे, असे मला वाटत नाही. त्यांच्यावर आधी कधीही हल्ला झाला नव्हता, आता कोणी अस करू शकेल, असा प्रश्न आठवले यांनी केला.

मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर आठवले मुंबईतील पत्रकारांशी बोलत होते. मंत्र्यांनी पत्नी सीमा आठवले यांच्यासह कोविड -१९ कोरोना प्रतिबंधक लस घेतली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER